top of page

How to Access N-List E-Resources: Demo Video

About N-List Consortia :

 

                   भारतातील विद्यापीठ व महाविद्यालयीन ग्रंथालयामध्ये सुसूत्रता आणण्याकरिता विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) INFLIBNET ची स्थापना केली. INFLIBNET द्वारे National Library Information Services Infrastructure for Scholarly Content (N-List) हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. N-List कन्सोर्शीयाच्या माध्यमातून ई-संसाधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. N-List मध्ये 1,99,000+ पेक्षा जास्त E-Books आणि 6000+ पेक्षा जास्त E-Journals उपलब्ध आहेत. ऑनलाईन नियतकालिके व ऑनलाईन डेटाबेस वाचनसाहित्य याचा कायदेशीर वापर करणे आणि सभासदत्व घेणे हे N-List कन्सोर्शीयामुळे शक्य झाले आहे. महाविद्यालय N-List चे दरवर्षी सभासद शुल्क अदा करून प्राध्यापक,विद्यार्थी व संशोधक विद्यार्थी यांना निशुल्क सभासदत्व दिले जात आहे. तरी सर्वांनी N-List चे सभासदत्व घेण्यासाठी पुढील सूचनेचे पालन करावे.

N-List Registraion : 

                           N-List कन्सोर्शीयाचे सभासद (Member) होण्याकरिता प्राध्यापक, विद्यार्थी यांनी खालील दिलेल्या गुगल- फॉर्म लिंकद्वारे आपली स्वतःची माहिती [ नाव,ई-मेल आयडी, मोबाईल नं, डेसिगनेशन (जसे-प्राध्यापक,विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी) ,डिपार्टमेंट इ.] भरून गुगल  फॉर्म सबमिट करावे. कॉलेज अडमीन आपण सबमिट केलेली माहिती  N-List कडे पाठविलेनंतर आपणास स्वतःच्या ई-मेलवर Member Activation चा मेल पाप्त होईल.

Registration Form Link : https://forms.gle/LCxDoRYPpwpuX5FB6

Get Activation E-Mail :

                               गुगल- फॉर्म मध्ये दिलेल्या  ईमेलवर आयडी वर  खालीलप्रमाणे  N-List मार्फत Member Activation चा मेल मिळेल. यामध्ये आपणास User ID व Password (One Time Password) प्राप्त होईल. तसेच या मेलमध्ये OTP चा वापर करून Password Set करण्याकरिता सोबत दिलेल्या कंसातील  [ You need to activate your username using the OTP and set your desired password using https://nlist.inflibnet.ac.in/vactivate.php. ]  लिंक मिळेल त्यावर क्लिक करून दिलेला User ID व Password (One Time Password)  च्या आधारे तुम्हाला तुमचा इच्छित पासवर्ड सेट करणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही Set केलेल्या Password च्या आधारे N- List मध्ये Members Login मधून .User ID व Password वापरून  प्रवेश करता येईल. 

N-List  Member's Login :

                                        N-List  मधील ई-संसाधने पाहण्याकरिता खालील लिंकद्वारे N-List होम पेजवरील Members Login मध्ये User ID म्हणजे स्वतःचा ईमेल व Password टाकून Login करावे.यानंतर Member User Consent हे पेज ओपन होईल यामध्ये Accept वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई-संसाधने उपलब्ध होतील.

 

N-List Link : https://nlist.inflibnet.ac.in/index.php

Access E-Resources :

                                  एकदा यशस्वीपणे Login झाल्यानंतर  N-List  मधील आपणास हव्या असलेल्या प्रकाशकाची ई-संसाधने ऑंनलाईन (Read) वाचता येतात,चाळता (Browse) येतात, तसेच जतन (Save) करता येतात.

bottom of page